बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५
शिवजयंतीनिमित्त रा.जि.प.शाळा उसर ठाकूरवाडीस मिळाला अमेरिकेतून ऑल इन वन प्रिंटर
शिवजयंतीनिमित्त रा.जि.प.शाळा उसर ठाकूरवाडीस आज अमेरिकेत वास्तव्यास असलेले रायगड जिल्ह्यातील रहाटाडवाडी ता.तळा जि.रायगड येथील सुपुत्र श्री.जितेंद्र हरिश्चंद्र खेडेकर यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रमोद दिगंबर मोरे यांनी whatsapp च्या स्टेट्स वर टाकलेल्या आव्हानास स्वतःहून प्रतिसाद देत रा.जि.प.शाळा उसर ठाकूरवाडीस ऑल इन वन प्रिंटर देण्याचे ठरवले व त्यांनी शिवजयंतीनिमित्त तो प्रिंटर शाळेला पाठवून दिला आहे. श्री.जितेंद्र हरिश्चंद्र खेडेकर हे भारतात शिकून मोठे झाले व नोकरी व्यवसायानिमित्त आज अमेरिकेत स्थायिक आहेत परंतु त्यांची मराठी शाळा,मराठी संस्कृती टिकवण्यासाठी नेहमीच योगदान आहे. विशेष म्हणजे त्यांचा व रा.जि.प.शाळा उसर ठाकूरवाडीचा काहीही संबंध नसताना फक्त गरीब मुलांची शाळा आहे व शाळेतील विद्यार्थ्यांना असलेली गरज लक्षात घेऊन त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. अमेरिकेत राहूनही त्यांनी आपल्या मातीशी असलेली नाळ कायम अशा सत्कार्याच्या माध्यमातून जोडून ठेवलेली आहे.मराठी शाळा टिकल्या पाहिजेत व गरिबांची मुले शिकली पाहिजेत अशी तळमळ असणारे अमेरिकेतील मराठी व्यक्तीमत्व म्हणजे श्री.जितेंद्र हरिश्चंद्र खेडेकर. देणाऱ्याने देत जावे| घेणाऱ्यांने घेत जावे | घेणाऱ्यांने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे | या उक्तीप्रमाणे त्यांचे दातृत्व घेण्यासारखे आहे. त्यांच्या या दातृत्वासाठी रा.जि.प.शाळा उसर ठाकूरवाडी सदैव ऋणी राहील.शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक पालक व समस्त ग्रामस्थ मंडळ उसर ठाकूरवाडी यांच्या तर्फे श्री.जितेंद्र हरिश्चंद्र खेडेकर यांचे हार्दिक आभार.तसेच जेव्हा ही भारतात याल त्यावेळी नक्की उसर ठाकूरवाडीस यावे अशी सर्व ग्रामस्थांनी इच्छा व्यक्त केली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
इयत्ता चौथी शिष्यवृत्ती सराव पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता
इयत्ता चौथी - इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव चाचणी मोफत शिष्यवृत्ती टेस्ट सीरीज पेपर क्र. २...
-
मराठी उतारा प्रश्न मंजूषा पुढचा प्रश्न (Next)
-
निकाल पाहण्यासाठी खाली क्लीक करा
-
समूहदर्शक शब्द प्रश्न मंजूषा 🎯 घटक: समूहदर्शक शब्द (एकूण २० प्रश्न) पुढचा प्रश्न (Next)
