बुधवार, ३१ जुलै, २०२४

माझ्या आईनी काय म्हटले असते ?

 माझ्या आईनी काय म्हटले असते ?



केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई ॲालेम्पिक स्पर्धेत शेवटच्या राउंड मध्ये धावतांना अंतिम रेषेपासुन फक्त काही मीटर दूर होता त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते, सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते, सर्व प्रेक्षक त्याच्या नावांचा जल्लोष करीत होते, येवढ्यातच तो गैरसमजातून अंतिम रेषा समजून रेषेच्या एक मिटर आधीच थांबला. त्याच्या मागून येणार्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या लक्षात आले की चिन्ह न समजल्या मुळे तो थांबला आहे. त्याने ओरडून अबेल ला पुढे जाण्यास सांगितले पण स्पॅनिश समजत नसल्याने तो हलला नाही शेवटी इव्हान ने त्याला ढकलुन अंतिम रेषे पर्यंत पोचविले, त्यामुळे अबेल पहिला व इव्हान दुसरा आला. पत्रकारांनी इव्हानला विचारले की तू असे का केलेस? तुला संधी असतांना तू पहिला क्रमांक का घालवलास ? 

इव्हान ने सांगितले माझे स्वप्न आहे की एक दिवस आम्ही अशी मानव जात बनू जी एकमेकांना मदत करेल आणि मी पहिला क्रमांक घालविला नाही. 

रिपोर्टर पुन्हा म्हणाला, पण तु केनियन स्पर्धकाला ढकलून पुढे आणलेस? यांवर इव्हान म्हणाला, तो पहिला आलेलाच होता ही रेस त्याचीच होती! पण रिपोर्टर पुन्हा म्हणाला, पण तु सुवर्ण पदक जिंकु शकला असतास! इव्हान म्हणाला, त्या जिंकण्याला काय अर्थ होता? माझ्या मेडलला मान मिळाला नसतां! माझी आई काय म्हणाली असती ? संस्कार हे पिढी दर पिढी पुढे जात असतात. मी पुढच्या पिढ्यांना काय दिले असते? दुसर्यांच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा न घेता त्यांना मदत करण्याची शिकवण माझ्या आईनी मला दिली आहे. 

धन्य ती माऊली आणि धन्य तिचे लेकरु🙏👌👍🌹

मंगळवार, ३० जुलै, २०२४

आज दिनांक 30 जुलै 2024 रोजी रा.जि. प.केंद्र शाळा तांबडी बुद्रुक येथे तांबडी केंद्राची शिक्षण परिषद पार पडली.







आज दिनांक 30 जुलै 2024 रोजी रा.जि. प.केंद्र शाळा तांबडी बुद्रुक येथे तांबडी केंद्राची शिक्षण परिषद पार पडली. 

        राष्ट्रगीताने शिक्षण परिषदेची सुरूवात करण्यात आली.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने शिक्षण परिषदेची सुरूवात करण्यात आली. तांबडी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताद्वारे सर्व मान्यवरांचे स्वागत केले.त्यानंतर श्री.वारे सरांनी सूत्रसंचालन केले.सर्वांच्या स्वागताने शिक्षण परिषदेच्या कामकाजास सुरूवात झाली.त्यामध्ये केंद्रामध्ये जिल्हाअंतर्गत बदलीने बदलून आलेले श्री. प्रमोद दिगंबर मोरे सर यांचे केंद्राच्या वतीने स्वागत करण्यात आले. 

                  तसेच केंद्रातील शिक्षक बलभीम राठोड सरांच्या दोन्ही मुलांनी दहावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल व त्यांची कन्येची पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई साठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

       त्यानंतर फणसाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुभाष जाधव सरांनी केंद्र शाळेला Table Organizer भेट म्हणून दिले.

            शिक्षण परिषदेमध्ये केंद्राचे केंद्रप्रमुख श्री विवेकानंद पोटे सर यांनी शिक्षण परिषदेची प्रस्तावना केली.  नवनियुक्त  शिक्षकांनी  त्यांच्या स्वप्नातील शाळा व वास्तव या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये काकडे मॅडम,सानिया  पठाण मॅडम, श्री.वारे सर, श्री.बोंद्रे सर, सौ. सोनाली मोरे मॅडम,श्रीम.रेणुका नाईकवाडे मॅडम,श्रीम.सरिता कांबळे मॅडम इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.

                नंतर जुन्या वरिष्ठ शिक्षकांनी त्यांना त्यांच्या सेवा काळामध्ये आजपर्यंत आलेल्या समस्या व त्यावर त्यांनी केलेल्या उपाययोजना यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.त्यामध्ये सौ. विशाखा पोटे मॅडम,श्री.संतोष यादव सर व श्री प्रमोद मोरे सर यांनी आपल्या सेवा कालावधीतील अनुभव व्यक्त केले.

            
                    त्याचबरोबर तांबडी केंद्रातील श्रीमती वर्षा दळवी मॅडम यांची महाराष्ट्रातून (बुलबुल)गाईड विभागात राष्ट्रीय स्तरावरील ए.एल.टी. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल त्यांचा केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला. दळवी मॅडमने कब बुलबुल बाबत थोडक्यात मार्गदर्शन केले.

            त्यानंतर वाबळेवाडी शाळा कशी नावारूपाला आली यासंबंधीचे व्हिडिओ दाखवण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापकांना कराव्या लागणाऱ्या ऑनलाईन कामाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेवटी केंद्रप्रमुख श्री.पोटे सरांनी नवीन आलेले जी.आर व नवीन शासन आदेशांचे वाचन करून दाखवले.
     
                श्री.पोटे सर व पोटे मॅडम यांच्या तर्फे त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त केंद्रातील सर्व शाळांना विविध फुलझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

             शेवटी  श्री.सुभाष जाधव सरांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व वंदे मातरम ने शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.



सोमवार, २९ जुलै, २०२४

शिव आधार फाऊंडेशन तर्फे उसर ठाकूरवाडी, वराठी व बेलवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

 शिव आधार फाऊंडेशन तर्फे उसर ठाकूरवाडी, वराठी व बेलवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप




आज सोमवार दि.29/07/2024 रोजी शिव आधार फाउंडेशन रोहा यांच्या यांच्या सौजन्याने  रा.जि.प. शाळा उसर ठाकूरवाडी येथे उसर ठाकूरवाडी, वराठी व बेलवाडी या तिन्ही शाळेच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी शिव आधार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री नारायण खुळे, सचिव श्री. निकेश पोकळे, प्रमुख पाहुणे श्री.रितेश जैन, सदस्य श्री.जगदीश मशेटे,सदस्य श्री.राकेश मोहिते,सदस्य श्री.पुर्वेश चोरगे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उसर ठाकूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रमोद दिगंबर मोरे सरांनी केले.कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे श्री रितेश जैन यांचा मुलगा सिध्दांत जैन च्या वाढदिवसानिमित्त त्यांनी तिन्ही शाळेतील मुलांना छत्रीचे व खाऊचे वाटप केले.शिव आधार फाउंडेशन च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमासाठी बेलवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.संदिप काशिनाथ चव्हाण सर,वराठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.वर्षा हिरामण दळवी मॅडम, उसर ठाकूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रमोद दिगंबर मोरे सर व उपशिक्षिका श्रीम.सोनाली प्रमोद मोरे मॅडम इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी श्रीम.दळवी मॅडम ने सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




शनिवार, २७ जुलै, २०२४

शिक्षण सप्ताह दिवस चौथा सांस्कृतिक दिवस उसर ठाकूरवाडी

 शिक्षण सप्ताह दिवस चौथा सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळा उसर ठाकूरवाडी येथे मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.




शिक्षण सप्ताह दिवस सहावा एक पेड़ माँ के नाम




शिक्षण सप्ताह दिवस सहावा एक पेड़ माँ के नाम

 आज दिनांक 27 जुलै 2024 रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा उसर ठाकूरवाडी ता. रोहा जि. रायगड येथे  शिक्षण सप्ताह दिवस सहावा अंतर्गत "एक पेड़ माँ के नाम" हा उपक्रम घेण्यात आला त्यामध्ये शाळेतील सर्व मुलांच्या आईच्या नावाने व आईच्या व मुलांच्या एक एक झाड लावण्यात आले त्या झाडाची जोपासनाची जोपासना करण्याची व काळजी घेण्याची जबाबदारी त्या मुलांवर देण्यात आली. 

बुधवार, २४ जुलै, २०२४

शिक्षण सप्ताह दिवस तिसरा दि.24/07/2024 क्रीडा दिवस

 

आज रा.जि.प.शाळा उसर ठाकुरवाडी येथे शिक्षण सप्ताह दिवस तिसरा क्रीडा दिवस निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

खालील खेळ व स्पर्धा घेण्यात आल्या.

🎯धावणे

🎯लांब उडी

🎯लंगडी

🎯तळ्यात मळ्यात

🎯 आईचे पत्र हरवले

माझी शाळा माझा वाढदिवस नाविन्यपूर्ण उपक्रम

  🎂🌸 रायगड जिल्हा परिषद शाळा उसर ठाकूरवाडी ता.रोहा 🌸🎂 वर्ष २०२६-२७ 🎉 माझी शाळा माझा वाढदिवस 🎉 विद्यार्थ्यांच्या आनंददायी सहभागातून रा...