सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

आपला स्वतःचा ब्लॉग कसा तयार करावा ?

 

ब्लॉग तयार करायला शिका व तंत्रस्नेही शिक्षक बनण्यातील एक पायरी पूर्ण करा

ब्लॉगर.com वर ब्लॉग कसा तयार करावा?

१) आपल्या वेब ब्राऊजर सुरू करूनwww.blogger.com वर जा.
२) जर आपले गुगल अकांऊट नसेल (म्हणजे आपण gmail  वैगरे गुगलच्या सुविधा वापरत नसाल तर)  सर्वप्रथम ते तयार करा.
       अ) त्यासाठी खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे उजव्या कोपर्‍यातील SIGN UP बटणावर क्लिक करा.

       ब) खाली दर्शवल्याप्रमाणे सर्व माहिती व्यवस्थित भरा.
३) जर तुमचे गुगल अकाऊंट असेल तर तुम्ही ते वापरून साइन इन करू शकतात. नवीन अकाऊंट तयार    करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी तुमचे युजर नेम आणि पासवर्ड टाकून साईन इन करा.



४) त्यानंतर खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे "Back to Blogger" या बटणावर क्लिक करा.


५) आता खाली दाखविल्याप्रमाणे तुम्हाला जर Google+ प्रोफाइल तयार करायची असल्यास "Create a Google+ profile" बटणावर क्लिक करा, अन्यथा केवळ "Create a Limited Blogger profile"  या बटणावर   क्लिक करून तुमचे Display name टाका आणि "Continue to Blogger" या बटणावर क्लिक करा.


६) आता नवीन पृष्ठ उघडेल. येथे उजव्या कोपर्‍यात "New Blog" या बटणावर क्लिक करा.




७)  त्यानंतर एक पॉप अप विंडो उघडेल. त्यात तुमच्या ब्लॉगचे नाव ( खालील आकृतीत 'Example Blog' ), वेब अ‍ॅड्रेस (खालील आकृतीत 'mr-exblog.blogspot.com' ) आणि तुम्हाला आवडणारी टेंम्प्लेट निवडा. टेंम्प्लेट म्हणजे तुमच्या ब्लॉगचा दर्शनीय अवतार. सविस्तर पुढे बघूच. आता 'Create Blog!' या बटणावर क्लिक करा. येथे भरलेली माहिती व निवडलेली टेंम्प्लेट तुम्ही नंतर केव्हाही बदलू शकता


.
८) आता तुमचा नवीन ब्लॉग तयार झालेला आहे. ब्लॉगवर लिहण्यासाठी खाली दाखविल्याप्रमाणे 'Start Posting' वर क्लिक करा.

९) आता तुम्ही ब्लॉगवर लिहू शकतात. त्यासाठी पोस्टला शीर्षक द्या आणि मजकूर लिहा. जर लिहणे पूर्ण झाले असेल तर Publish बटणावर क्लिक करा म्हणजे ती पोस्ट तुमच्या ब्लॉगवर दिसेल.  नाहीतर  पोस्ट अर्धवट असल्यास save बटणावर क्लिक करा म्हणजे ती पोस्ट तुमच्या ब्लॉगवर न दिसता जतन केली जाईल. नवीन पोस्टबद्दल सविस्तर नंतर बघूच.


१०) तुमच्या ब्लॉग संबधीत माहिती (पोस्ट्स, स्टॅट्स, सेटिंग्स, इ.) पाहण्यासाठी ब्लॉगच्या नावावर क्लिक करा. त्यानंतर खाली पृष्ठ उघडेल.

 ११) आता तुमचा ब्लॉग पाहण्यासाठी "View Blog" बटणावर क्लिक करा.
बस काम फत्ते!

एका गुगल अकाऊंटवर तुम्ही जास्तीत जास्त १०० ब्लॉग्ज बनवू शकता. प्रत्येक ब्लॉगसाठी वेगळे अकाऊंट तयार करण्याची आवश्यकता नाही.

आजपासून पृथ्वीला मिळाला नवीन चंद्र

 


शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४

एक दिवस आपण ही लहान होऊयात

 काल दि २६ सप्टेंबर २०२४ रोजी अमृतवेल फाउंडेशन तर्फे उसर ठाकूरवाडी येथे *"चित्रकला स्पर्धा"* आयोजली करण्यात आली.






(या चित्रकला स्पर्धेत शिक्षक,विद्यार्थी व अमृतवेल फाउंडेशन चे सर्व सदस्य यांनी चित्रकलेचा आनंद घेतला "एक दिवस आपण ही लहान होऊयात"याप्रमाणे लहान मुलांसोबत लहान होण्याचा प्रत्यक्ष अनुभव सर्वांनी घेतला. त्याच प्रमाणे त्यांना *प्रत्येक विद्यार्थ्यास*

१. लिखाणाची वही १ किंवा २

   २.चित्रकला वही १

   ३.रंगीत खडू बॉक्स

४. पेन्सिल,खोड्राबर, पट्टी ,शारपनर किट 

५. खाऊ (लाडू चिवडा पॅकेट)

 वाटप करणार करण्यात.

ह्यात वाढदिवसाच्या अनुषंगाने

*पायल शेडगे*

*प्रवीण नाकती*

 *मेहता सर आपल्या आईच्या स्मरणार्थ* सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

देणार्‍याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणाऱ्याचे हातच घ्यावे.

शेवटी सुंदर चित्रांना बक्षीस वाटप करण्यात आले व शाळेच्या वतीने अमृतवेल फाउंडेशन चे आभार व्यक्त करण्यात आले.

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

17 लाख शिक्षक एकदाच रजेवर, काय कारण आहे ? महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना समजले पाहिजे.

 राज्यातील गोरगरीब आणि वाडी-वस्ती व तांड्या वरील बहुजन समाजाचे शिक्षण वाचविण्यासाठी सर्व शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पालक, शिक्षक व शिक्षण प्रेमी जनतेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर...


विराट आक्रोश मोर्चा




मोर्चाद्वारे मांडल्या जाणाऱ्या मागण्या


(1) 15 मार्च 2024 चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा.


(2) 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा 5 सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय रद्द करावा.


(3) दि. 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा.


(4) सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व वरिष्ठ वेतनश्रेणी धारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा.


(5) विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब मिळावेत, 2024-25 वर्षात राबविली गणवेश योजना रह करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी. अद्यापही अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत, त्याठिकाणी तातडीने पाठ्यपुस्तके व पुरवावीत, पाठ्यपुस्तकांना कोरी पाने न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात.


(6) शैक्षणिक-अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी.


(7) जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी निवासाची सक्ती रद्द करणे.


(8) राज्यातील शिक्षकांना 10-20-30 सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी.


(9) सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी मिळावी.


(10) अनुकंपा तत्त्वावर नियुक्त शिक्षकांना TET अनिवार्यतेचा शासन निर्णय रद्द करावा.


(11) नपा/ मनपा गट क, ड मधील शिक्षकांच्या वेतनाचे 100% अनुदान शासनाने द्यावे या शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीत E-Kuber अंतर्गत व्हावे. 

12) शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी. (


(13) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळात वाढती अनेकविध अभियाने उपक्रम, निरनिराळे सप्ताह,


बहिःशाल संस्थांच्या परीक्षा Online माहित्या, माहित्यांची वारंवारिता इत्यादी कामे ताबडतोब थांबवावी.


(14) विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे.



मराठी प्राणी चित्रवाचन

 इयत्ता पहिली ते चौथी 

विषय सामान्य ज्ञान 

घटक मराठी प्राणी चित्रवाचन 

रविवार, २२ सप्टेंबर, २०२४

Kbc QUIZ

 

KBC Quiz

KBC Quiz

Who is the current president of the USA?

शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

स्वच्छतेची प्रतिज्ञा स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता

 स्वच्छतेची प्रतिज्ञा 

स्वच्छता ही सेवा 

स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता 

दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४

स्वच्छतेची प्रतिज्ञा

महात्मा गांधीनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र नव्हते, तर त्या सोबतच एक स्वच्छ व विकसित देशाची संकल्पना होती.

महात्मा गांधीजींनी गुलामीतून भारत मातेला मुक्त करुन स्वातंत्र्य मिळवून दिले.

आता भारत मातेला अस्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची सेवा करणे आपले आद्य कर्तव्य आहे. मी शपथ घेतो की, मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागृत राहील आणि त्यासाठी वेळ ही देईल.

दरवर्षी १०० तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातुन २ तास श्रमदान करून स्वच्छतेच्या संकल्पनेला पुर्ण करेल.

मी स्वतः घाण करणार नाही, आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. सर्व प्रथम मी स्वतः माझे कुटुंब, माझी गल्ली/वस्ती, माझे गाव तसेच माझ्या कार्यस्थळापासुन या कामास सुरूवात करेन. मला हे मान्य आहे, की जगामधील जे देश स्वच्छ आहे. त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरीक स्वतः घाण करीत नाही व घाण होऊ देत नाहीत.

या विचारांचा मी गावोगावी व गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन. मी आज जी शपथ घेत आहे, ती आणखी १०० लोकांनाही घ्यायला लावेल.

ते ही माझ्या सारखेच स्वच्छतेसाठी १०० तास देतील यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मला माहित आहे की, स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे एक पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल.

।। जय हिंद, जय स्वच्छता ।।




मराठी खेळांची ओळख

 

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४

माता पालक संघ शाळा उसर ठाकूरवाडी

 

माता पालक संघ शाळा उसर ठाकूरवाडी

अ.क्र सभासदाचे नावपद
०१ श्री.प्रमोद दिगंबर मोरे   अध्यक्ष 
०२ सौ.नीरा हरेश शिद  सदस्य 
०३ सौ.मालती चंद्रकांत वारगुडे सदस्य 
०४ सौ.लीला गजानन वारगुडे  सदस्य 
०५ सौ.सुशीला लक्ष्मण लेंडी  सदस्य 
०६ सौ.सोनाली प्रमोद मोरे  सचिव 

शिक्षक पालक संघ शाळा उसर ठाकूरवाडी

शिक्षक पालक संघ शाळा उसर ठाकूरवाडी

अ.क्र सभासदाचे नावपद
०१ श्री.प्रमोद दिगंबर मोरे   अध्यक्ष 
०२ श्री.यशवंत गणेश शिद  उपाध्यक्ष
०३ सौ.यमुना बाळाराम लेंडी सदस्य 
०४ श्री.बबन महादेव वारगुडे  सदस्य 
०५ सौ.उर्मिला येशुराम वारगुडे  सदस्य 
०६ सौ.सोनाली प्रमोद मोरे  सचिव 

इयत्ता पहिली मराठी रंगाची ओळख

 


सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४

शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

दोन अंकी संख्येची वजाबाकी

 KBC पध्दतीने INTERACTIVE ACTIVITY 



रिकाम्या जागी योग्य इंग्रजी मुळाक्षरे भरा

 रिकाम्या जागी योग्य इंग्रजी मुळाक्षरे भरा

Fill in blank correct Alphabets


Design by Pramod More



शरीराचे अवयव ओळख Parts of Body

 लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त 

आजच्या ॲक्टीविटीमध्ये सर्वांचा कस लागणार आहे.

बघूया कोण लवकरात लवकर व अचूक ॲक्टीविटी सोडवतो.

  


गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

बुधवार, ११ सप्टेंबर, २०२४

मोठी इंग्रजी मुळाक्षरे मोठी लिपी व लहान लिपी जोड्या लावणे

 मोठी इंग्रजी मुळाक्षरे मोठी लिपी व लहान लिपी जोड्या लावणे


पक्ष्यांच्या गुणधर्मानुसार पक्षी ओळखा

 पक्ष्यांच्या गुणधर्मानुसार पक्षी ओळखा


प्राण्याची ओळख जोड्या लावा

 प्राण्यांची ओळख जोड्या लावा

मराठी नावे व इंग्रजी नावे यांच्या जोड्या लावा 

लगेच निकाल पाहण्यासही मिळेल.

लिडरबोर्ड वर क्लीक केल्यास टेस्ट सर्वात फास्ट व सर्वात अचूक जो सोडवेल तो टॉपवर असेल.



सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे

 आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !



एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो

जो जातो तो सुटतो , परीक्षा असते मागे राहणाऱ्याची 

कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत 

जो मागे रहातो त्याला आठवणी येणं , अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !

आता प्रश्न असा असतो की ही आसवं हे रडणं थांबवायचं कुणी ? 

मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ?

पाठीवरून हात कुणी फिरवायचा ?

निश्चितपणे ही जवाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची ....

थोडक्यात काय तर

दोघांपैकी एकजण गेल्यानंतर

मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडिल होता आलं पाहिजे !

लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात

आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात

स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात

परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात


म्हणून आता ही आपली जवाबदारी असते , त्यांच्या सारखच निस्वार्थ प्रेम करण्याची

असं झालं तरच ते जगू शकतील 

नसता " तो माणूस म्हणजे वडील " किंवा " ती स्त्री म्हणजे आई " तुटून जाऊ शकते , कोलमडून पडू शकते !


आणि ही जवाबदारी फक्त मुलं , मुली आणि सुना यांचीच असते असे नाही 

तर ती जवाबदारी प्रत्येक नातेवाईकाची , परिचिताची , मित्र मैत्रिणींची .......सर्वांची असते !


फक्त छत , जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरंच ही माणसं जगू शकतील !


आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय ? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ......म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या !

केवळ माया , प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा 

त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या !

उद्या हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो 

म्हणून नेहमी सर्वांशी प्रेमाने,मायेने आणि आपुलकीने वागा !

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती सराव पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता

इयत्ता चौथी - इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव चाचणी मोफत शिष्यवृत्ती टेस्ट सीरीज पेपर क्र. २...