सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

रोहा तालुकास्तरीय स्पर्धेत उसर ठाकूरवाडी शाळेचा प्रथम क्रमांक

 तालुकास्तरीय स्पर्धेत उसर ठाकूरवाडी शाळेचा प्रथम क्रमांक



आज रोहा तालुक्यातील सर्व शाळांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा रोहा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे आयोजन मा.गटशिक्षणाधिकारी धायगुडे मॅडम, शिक्षण विभाग रोहा तालुका व तालुका अध्यक्ष श्री.अजय कापसे सर,क्रीडा समन्वयक श्री.संतोष यादव सर यांनी केले. सर्व स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. त्या स्पर्धेत उसर ठाकूरवाडी शाळेने घवघवीत यश मिळवले. शाळेतील जान्हवी खेळू लेंडी या विद्यार्थिनीने मातीचे शिल्प तयार करणे स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन अतिशय सुबक व सुंदर शिल्प तयार करून *तालुक्यात प्रथम क्रमांक* मिळवून उसर ठाकूरवाडी शाळेचे व गावाचे नावलौकिक केले आहे. व प्रथम क्रमांक मिळवून तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या शाळेवर नवनियुक्त शिक्षणसेविका सौ.सोनाली मोरे मॅडम यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याबद्दल तिला हे यश संपादन करता आले. 

    अशा पद्धतीने उसर ठाकुरवाडी शाळेची विद्यार्थिनी जान्हवी खेळू लेंडी हिने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये मोठे यश संपादन केले त्याबद्दल जान्हवीचे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद दिगंबर मोरे सर व शिक्षिका सौ.सोनाली प्रमोद मोरे मॅडम यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दिगंबर वारगुडे,उपाध्यक्ष श्री.मारूती शिद व गावकीचे अध्यक्ष श्री.यशवंत वारगुडे, ग्रामपंचायत सदस्या राजेंद्री बबन वारगुडे,जान्हवीचे पालक खेळू लेंडी व संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याने सर्व पालक व ग्रामस्थ आनंदित झाले आहेत.तांबडी बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.विवेकानंद पोटे सरांनी व केंद्रातील सर्व शाळांनी ही जान्हवीचे कौतुक केले व तिला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४

वीर बालदिवस विशेष माहिती


वीर बालदिवस

वीर बालदिवस हा दिवस साहस, शौर्य, आणि बलिदान यासाठी प्रसिद्ध असलेल्या बालकांना सन्मानित करण्यासाठी साजरा केला जातो. भारतात, 26 डिसेंबर हा दिवस सिख धर्मातील चार साहिबजादे, म्हणजेच गुरू गोबिंदसिंह यांच्या चार पुत्रांच्या बलिदानाची आठवण म्हणून साजरा केला जातो. विशेषतः, हा दिवस गुरू गोबिंदसिंह यांच्या दोन धाकट्या पुत्रांचे शौर्य आणि बलिदान स्मरणात ठेवतो.


इतिहास व पार्श्वभूमी:

गुरू गोबिंदसिंह आणि त्यांचे चार पुत्र

गुरू गोबिंदसिंह, सिख धर्माचे दहावे गुरू, यांना चार पुत्र होते:


बाबा अजीत सिंग

बाबा जुझार सिंग

बाबा जोरावर सिंग

बाबा फतेह सिंग

मुघल आक्रमण आणि बलिदान:

सिख धर्माला संपवण्यासाठी मुघल साम्राज्याच्या औरंगजेबाने अनेक प्रयत्न केले. गुरू गोबिंदसिंह यांचा परिवार या संघर्षात वेगळा झाला. धाकटे पुत्र (जोरावर सिंग आणि फतेह सिंग) आणि त्यांच्या आजीमातेना मुघलांनी पकडले.


सिरहिंदचा प्रसंग:


धाकट्या पुत्रांना मुघल गव्हर्नर वजीर खानसमोर उपस्थित केले गेले. त्यांच्यावर सिख धर्म सोडण्याचा दबाव टाकण्यात आला.

मात्र, त्यांनी आपल्या धर्माशी निष्ठा दाखवत कोणताही दबाव स्विकारला नाही.

परिणामी, त्यांना जिवंत भिंतीत बंदिस्त करण्यात आले. त्यांच्या शौर्यामुळे ते सिख इतिहासात अमर झाले.

थोरले पुत्र:


थोरले पुत्र (बाबा अजीत सिंग आणि बाबा जुझार सिंग) यांनी चामकौरच्या युद्धात शत्रूशी लढताना बलिदान दिले.

महत्त्व:

वीर बालदिवस साजरा करण्यामागचा उद्देश तरुण पिढीला सिख धर्मातील शौर्य, निष्ठा, आणि धर्मासाठी दिलेले बलिदान याबद्दल जागरूक करणे हा आहे. हा दिवस फक्त सिख धर्मापुरता मर्यादित नसून, सर्व धर्मातील वीर बालकांचे स्मरण म्हणून साजरा केला जातो.


स्मरणोत्सव व कार्यक्रम:

प्रवचन व कीर्तन: गुरुद्वारांमध्ये धार्मिक कार्यक्रम घेतले जातात.

बाल शौर्य कथा: शाळा व संस्थांमध्ये मुलांना वीर बालकांच्या कथा सांगितल्या जातात.

समर्पण व सेवा: अनेक ठिकाणी अन्नदान व सेवा कार्यक्रम राबवले जातात.

वीर बालदिवस हा धर्म, शौर्य, आणि नीतिमूल्यांच्या जोपासनेसाठी प्रेरणादायी दिवस आहे.



1. वीर बाल दिवस म्हणजे काय?

वीर बाल दिवस हा भारतात साजरा होणारा एक विशेष दिवस आहे, जो शीख धर्माचे दहावे गुरु, गुरु गोबिंद सिंग यांच्या चार सुपुत्रांच्या अतुलनीय त्यागाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी आपण त्यांच्या शौर्याला वंदन करून त्यांच्याकडून प्रेरणा घेतो.


2. वीर बाल दिवस कधी साजरा केला जातो?

वीर बाल दिवस दरवर्षी २६ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो.


3. वीर बाल दिवस का साजरा केला जातो?

वीर बाल दिवस साजरा करण्यामागे उद्देश असा आहे की आपण आपल्या देशाच्या इतिहासातील शौर्यपूर्ण घटनांची आठवण ठेवावी आणि भविष्यातील पिढ्यांना देशप्रेम, निष्ठा आणि बलिदानाचे महत्त्व पटवून द्यावे.


4. गुरु गोबिंद सिंग यांच्या मुलांनी कोणते बलिदान दिले?

गुरु गोबिंद सिंग यांचे चार सुपुत्र – अजीत सिंग, जुझार सिंग, जोरावर सिंग, आणि फतेह सिंग यांनी शीख धर्म आणि राष्ट्रासाठी प्राणाची आहुती दिली. जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांनी केवळ ७ आणि ९ वर्षांच्या वयात इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार देऊन मृत्यूला सामोरे गेले, तर अजीत सिंग आणि जुझार सिंग यांनी युद्धभूमीत वीरमरण स्वीकारले.


5. वीर बाल दिवसाचा बालकांसाठी काय महत्त्व आहे?

वीर बाल दिवस बालकांना प्रेरणा देतो की वय कधीच पराक्रमासाठी अडसर ठरत नाही. हा दिवस त्यांना धैर्य, निष्ठा आणि बलिदानाचे महत्त्व शिकवतो आणि त्यांच्या जीवनात देशप्रेम जागृत करतो.

बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

केंद्रस्तरीय स्पर्धेत उसर ठाकूरवाडी शाळेचे यश

 


केंद्रस्तरीय स्पर्धेत उसर ठाकूरवाडी शाळेचे यश


आज तांबडी केंद्रातील सर्व शाळांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा उसर व निवी ठाकूरवाडी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे आयोजन मा.केंद्रप्रमुख श्री.विवेकानंद पोटे सर तालुका क्रीडा समन्वयक श्री.संतोष यादव सर व केंद्रस्तरीय आयोजन कमिटीचे अध्यक्ष श्री.सुधीर पाटील सर यांनी केले. सर्व स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. त्या स्पर्धेत उसर ठाकूरवाडी शाळेने घवघवीत यश मिळवले. शाळेतील सर्व मुलांनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यश संपादन केले शाळेने एकूण पाच बक्षीस मिळवली त्यामध्ये चार बक्षीस प्रथम क्रमांकाची व एक बक्षीस द्वितीय क्रमांकाचं. दोरी उड्या मारणे प्रथम क्रमांक, शिल्प तयार करणे प्रथम क्रमांक, समूह नृत्य प्रथम क्रमांक, पथनाट्य प्रथम क्रमांक व समूह गीत गायन द्वितीय क्रमांक अशा पद्धतीने उसर ठाकुरवाडी शाळेने केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये केंद्रामध्ये घवघवीत यश संपादन केले त्याबद्दल सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद दिगंबर मोरे सर व शिक्षिका सौ.सोनाली प्रमोद मोरे मॅडम यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दिगंबर वारगुडे,उपाध्यक्ष श्री.मारूती शिद व गावकीचे अध्यक्ष श्री.यशवंत वारगुडे, ग्रामपंचायत सदस्या राजेंद्री बबन वारगुडे व संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच एकदम एवढे बक्षीस मिळाल्याने सर्व पालक व ग्रामस्थ आनंदित झाले आहेत.



अभिनंदन...अभिनंदन...अभिनंदन...

केंद्रस्तरीय क्रीडा व व्यक्तीमत्व विकास स्पर्धा

केंद्र तांबडी ता.रोहा जि.रायगड


उसर ठाकूरवाडी शाळेचे सुयश

एकूण 5 बक्षिसे 

4 प्रथम क्रमांक व 1 द्वितीय क्रमांक


दोरी उड्या मारणे प्रथम क्रमांक

नियती खेळू लेंडी 


शिल्प तयार करणे प्रथम क्रमांक

जान्हवी खेळू लेंडी


समूहनृत्य प्रथम क्रमांक

1) नियती खेळू लेंडी

2) जान्हवी खेळू लेंडी

3) मयुरी परशुराम हंबीर

4) सोनाली यशवंत शिद

5) तन्वी गजानन वारगुडे

6) आकृती दत्ता शिद

7) नंदिनी येशुराम वारगुडे

8) गितांजली गजानन लेंडी

9) श्रृती हरेश शिद 

10) पवित्र येशुराम वारगुडे

11) दिपेश महेश लेंडी

12) रोहिदास चंद्रकांत वारगुडे

13) सार्थक बबन वारगुडे

14) प्रविण लक्ष्मण लेंडी


पथनाट्य प्रथम क्रमांक

1) नियती खेळू लेंडी

2) जान्हवी खेळू लेंडी

3) मयुरी परशुराम हंबीर

4) सोनाली यशवंत शिद

5) तन्वी गजानन वारगुडे

6) आकृती दत्ता शिद

7) नंदिनी येशुराम वारगुडे

8) पवित्र येशुराम वारगुडे

9) रोहिदास चंद्रकांत वारगुडे

10) सार्थक बबन वारगुडे

11) प्रविण लक्ष्मण लेंडी


समूहगीत गायन द्वितीय क्रमांक

1) नियती खेळू लेंडी

2) जान्हवी खेळू लेंडी

3) मयुरी परशुराम हंबीर

4) सोनाली यशवंत शिद

5) तन्वी गजानन वारगुडे

6) आकृती दत्ता शिद

7) नंदिनी येशुराम वारगुडे

8) सार्थक बबन वारगुडे


स्पर्धेत सहभागी घेऊन मोठे यश संपादन केल्याबद्दल सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन


इयत्ता चौथी शिष्यवृत्ती सराव पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता

इयत्ता चौथी - इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव चाचणी मोफत शिष्यवृत्ती टेस्ट सीरीज पेपर क्र. २...