सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

सखी सावित्री समिती शाळा उसर ठाकूरवाडी ता.रोहा जि.रायगड

सखी सावित्री समिती शाळा उसर ठाकूरवाडी

अ.क्र सभासदाचे नावपद
०१ श्री.दिगंबर अनंत वारगुडे  अध्यक्ष 
०२ सौ.सोनाली प्रमोद मोरे  शिक्षिका प्रतिनिधी 
०३ सौ.जयश्री मधुकर वारगुडे समुपदेशक 
०४ डॉ.सौ.गौरी गिरीश पंडित  वैद्यकीय तज्ञ महिला 
०५ सौ.संगीता संतोष धवडेकर  अंगणवाडी सेविका 
०६ श्री.गणेश महादेव वारगुडे  पोलीस पाटील 
०७ सौ.राजेंद्री बबन वारगुडे ग्रा.पं.महिला सदस्य 
०८ सौ.भाग्यश्री गजानन लेंडी  पालक महिला प्रतिनिधी 
०९ कु.पवित्र येशुराम वारगुडे  विद्यार्थी प्रतिनिधी 
१०कु.सार्थक बबन वारगुडे   विद्यार्थी प्रतिनिधी 
११ कु.सोनाली यशवंत शिद विद्यार्थिनी प्रतिनिधी 
१२कु.मयुरी परशुराम हंबीर  विद्यार्थिनी प्रतिनिधी 
१३ श्री.प्रमोद दिगंबर मोरे सचिव

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४

आनंददायी शनिवार स्तर १ पहिली दुसरी २४ ऑगस्ट २०२४ रोजी घ्यायचे उपक्रम

आनंददायी शनिवार 
स्तर १ पहिली दुसरी 
२४ ऑगस्ट २०२४ रोजी घ्यायचे उपक्रम 


विषय मराठी 
शब्दडोंगर 
कालावधी 30 मिनिटे 
झाड
       ते झाड आहे
    ते झाड हिरवेगार आहे
  ते झाड खूप खूप उंच आहे
ते झाड गोड आंबट चिंचेचे आहे.
ते झाड चिंचा खायला याअसे बोलावत आहे
चला चला सारे जाऊ गोड आंबट चिंचा खाऊ


गणित 
बेरीज, वजाबाकीची गोष्ट 
कालावधी 30 मिनिटे 



इंग्रजी 
 Find Odd Man Out 
कालावधी 30 मिनिटे 



कला 
 कविता साभिनय सादर करा
कालावधी 25 मिनिटे 



कार्यानुभव 
फुगा फुगवणे टायरचे निरीक्षण भिरभिरे 
कालावधी 20 मिनिटे 



शारीरिक शिक्षण 
दोरीवरच्या उड्या 
कालावधी 25 मिनिटे 

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४

संख्या ओळख सराव इयत्ता पहिली interactive worksheet

 

नाविन्यपूर्ण उपक्रम आजचा स्वच्छतेचा मानकरी पुरस्कार

 रा.जि.प.शाळा उसर ठाकूरवाडी

         ता.रोहा जि.रायगड



नाविन्यपूर्ण उपक्रम

आजचा स्वच्छता पुरस्कार 


संकल्पना

सौ.सोनाली प्रमोद मोरे (शिक्षणसेविका)

रा.जि.प.शाळा उसर ठाकूरवाडी


मार्गदर्शक

श्री.प्रमोद दिगंबर मोरे (मुख्याध्यापक)

रा.जि.प.शाळा उसर ठाकूरवाडी

उपक्रमाचा उद्देश

1) विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागणे.

2) विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व समजणे.

3) स्वच्छतेतून आरोग्य चांगले ठेवणे.

4) स्वच्छतेतून मन प्रसन्न ठेवणे.

5) मन प्रसन्नतेतून शिक्षणात गोडी निर्माण करणे.

                रा.जि.प.शाळा उसर ठाकूरवाडी शाळेतील मुले शाळेत येताना अस्वच्छ कपडे,वैयक्तिक स्वच्छता न करता,केस न विंचरलेले,कपड्यांना बटन न लावता,फाटके कपडे,अशा प्रकारे शाळेत येतात.म्हणून शाळेच्या नवनियुक्त शिक्षणसेविका सौ.सोनाली मोरे मॅडम यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागाव्यात त्यासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे मुख्याध्यापक श्री.मोरे सरांना सांगितले असता ती संकल्पना खूप छान वाटली व लगेच ही संकल्पना सर्व वर्गांसाठी लागू करूया असे मुख्याध्यापक श्री.मोरे सरांनी सांगितले. 

            नाविन्यपूर्ण उपक्रमानुसार दरदिवशी स्वच्छ व सुंदर येणाऱ्या मुलांचा फिरती ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून आजचा स्वच्छता पुरस्काराचा मानकरी या नावाने पुरस्कार देण्याचे ठरले. त्याप्रमाणे प्रत्येक वर्गातून स्वच्छ व सुंदर येणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर पुरस्कार देण्याचे ठरले.

              आज उपक्रमाच्या पहिल्या दिवशीच उपक्रमाला चांगले यश आल्याचे दिसून आले. आज सर्व विद्यार्थी स्वच्छ व सुंदर कपडे घालून आले. उपक्रमात ठरल्याप्रमाणे आजचे स्वच्छता पुरस्काराचे मानकरी खालीलप्रमाणे निवडून त्यांना आजचा स्वच्छता पुरस्कार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

आजचे स्वच्छता पुरस्काराचे मानकरी.

पहिली

1) तनिष्का गजानन लेंडी

2) हंसिका दिगंबर वारगुडे  

दुसरी

1) जागृती प्रमोद शिद 

तिसरी

1) सोनाली यशवंत शिद

2) गीतांजली गजानन लेंडी

चौथी

1) आकृती दत्ता शिद

सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

शाळा व्यवस्थापन समिती उसर ठाकूरवाडी ता.रोहा जि.रायगड

शाळा व्यवस्थापन समिती उसर ठाकूरवाडी

अ.क्र सभासदाचे नावपद
०१ श्री.दिगंबर अनंत वारगुडे  अध्यक्ष 
०२ श्री.मारुती पांडुरंग शिद  उपाध्यक्ष 
०३ श्री.खेळू परशुराम लेंडी सदस्य
०४ सौ.वासंती यशवंत शिद सदस्य
०५ सौ.भाग्यश्री गजानन लेंडी  सदस्य
०६ सौ.रामी प्रमोद शिद सदस्य
०७ सौ.उर्मिला येशुराम वारगुडे सदस्य
०८ श्री.महेश लेंडी सदस्य
०९ श्री.हरेश शिद सदस्य
१० श्री.दत्ता शिद सदस्य
११ श्री.परशुराम हंबीर सदस्य
१२ श्री.गजानन वारगुडे  सदस्य
१३ श्री.हरी होनाजी लेंडी शिक्षण तज्ञ 
१४ सौ.राजेन्द्री बबन वारगुडे  स्था. प्राधि. सदस्य 
१५ सौ.सोनाली प्रमोद मोरे शिक्षक प्रतिनिधी 
१६  कु.सार्थक बबन वारगुडे  विद्यार्थी प्रतिनिधी 
१७ कु.सोनाली यशवंत शिदविद्यार्थी प्रतिनिधी 
१८ श्री.प्रमोद दिगंबर मोरे सचिव

रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

एक पदक आणि पराभव यात किती अंतर असतं?

 एक पदक आणि पराभव यात किती अंतर असतं? कधीकधी सेकंदाच्या हजाराव्या हिश्शाचं.पॅरिस ऑलिंपिकमध्ये तसंच काहीसं चित्र दिसलं. 

अ‍ॅथलेटिक्समध्ये सर्वात मानाची मानली जाणारी 100 मीटर धावण्याची शर्यत एवढी थरारक झाली, की निकालात काही मिलिसेकंदांचा फरक होता. 

#NoahLyles #ParisOlympics2024 #100meters #Athletics









गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती सराव पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता

इयत्ता चौथी - इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव चाचणी मोफत शिष्यवृत्ती टेस्ट सीरीज पेपर क्र. २...