मंगळवार, ३० जुलै, २०२४

आज दिनांक 30 जुलै 2024 रोजी रा.जि. प.केंद्र शाळा तांबडी बुद्रुक येथे तांबडी केंद्राची शिक्षण परिषद पार पडली.







आज दिनांक 30 जुलै 2024 रोजी रा.जि. प.केंद्र शाळा तांबडी बुद्रुक येथे तांबडी केंद्राची शिक्षण परिषद पार पडली. 

        राष्ट्रगीताने शिक्षण परिषदेची सुरूवात करण्यात आली.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने शिक्षण परिषदेची सुरूवात करण्यात आली. तांबडी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताद्वारे सर्व मान्यवरांचे स्वागत केले.त्यानंतर श्री.वारे सरांनी सूत्रसंचालन केले.सर्वांच्या स्वागताने शिक्षण परिषदेच्या कामकाजास सुरूवात झाली.त्यामध्ये केंद्रामध्ये जिल्हाअंतर्गत बदलीने बदलून आलेले श्री. प्रमोद दिगंबर मोरे सर यांचे केंद्राच्या वतीने स्वागत करण्यात आले. 

                  तसेच केंद्रातील शिक्षक बलभीम राठोड सरांच्या दोन्ही मुलांनी दहावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल व त्यांची कन्येची पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई साठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

       त्यानंतर फणसाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुभाष जाधव सरांनी केंद्र शाळेला Table Organizer भेट म्हणून दिले.

            शिक्षण परिषदेमध्ये केंद्राचे केंद्रप्रमुख श्री विवेकानंद पोटे सर यांनी शिक्षण परिषदेची प्रस्तावना केली.  नवनियुक्त  शिक्षकांनी  त्यांच्या स्वप्नातील शाळा व वास्तव या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये काकडे मॅडम,सानिया  पठाण मॅडम, श्री.वारे सर, श्री.बोंद्रे सर, सौ. सोनाली मोरे मॅडम,श्रीम.रेणुका नाईकवाडे मॅडम,श्रीम.सरिता कांबळे मॅडम इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.

                नंतर जुन्या वरिष्ठ शिक्षकांनी त्यांना त्यांच्या सेवा काळामध्ये आजपर्यंत आलेल्या समस्या व त्यावर त्यांनी केलेल्या उपाययोजना यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.त्यामध्ये सौ. विशाखा पोटे मॅडम,श्री.संतोष यादव सर व श्री प्रमोद मोरे सर यांनी आपल्या सेवा कालावधीतील अनुभव व्यक्त केले.

            
                    त्याचबरोबर तांबडी केंद्रातील श्रीमती वर्षा दळवी मॅडम यांची महाराष्ट्रातून (बुलबुल)गाईड विभागात राष्ट्रीय स्तरावरील ए.एल.टी. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल त्यांचा केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला. दळवी मॅडमने कब बुलबुल बाबत थोडक्यात मार्गदर्शन केले.

            त्यानंतर वाबळेवाडी शाळा कशी नावारूपाला आली यासंबंधीचे व्हिडिओ दाखवण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापकांना कराव्या लागणाऱ्या ऑनलाईन कामाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेवटी केंद्रप्रमुख श्री.पोटे सरांनी नवीन आलेले जी.आर व नवीन शासन आदेशांचे वाचन करून दाखवले.
     
                श्री.पोटे सर व पोटे मॅडम यांच्या तर्फे त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त केंद्रातील सर्व शाळांना विविध फुलझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

             शेवटी  श्री.सुभाष जाधव सरांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व वंदे मातरम ने शिक्षण परिषदेची सांगता करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती सराव पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता

इयत्ता चौथी - इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव चाचणी मोफत शिष्यवृत्ती टेस्ट सीरीज पेपर क्र. २...