रा.जि.प.शाळा उसर ठाकूरवाडी
ता.रोहा जि.रायगड
नाविन्यपूर्ण उपक्रम
आजचा स्वच्छता पुरस्कार
संकल्पना
सौ.सोनाली प्रमोद मोरे (शिक्षणसेविका)
रा.जि.प.शाळा उसर ठाकूरवाडी
मार्गदर्शक
श्री.प्रमोद दिगंबर मोरे (मुख्याध्यापक)
रा.जि.प.शाळा उसर ठाकूरवाडी
उपक्रमाचा उद्देश
1) विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागणे.
2) विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व समजणे.
3) स्वच्छतेतून आरोग्य चांगले ठेवणे.
4) स्वच्छतेतून मन प्रसन्न ठेवणे.
5) मन प्रसन्नतेतून शिक्षणात गोडी निर्माण करणे.
रा.जि.प.शाळा उसर ठाकूरवाडी शाळेतील मुले शाळेत येताना अस्वच्छ कपडे,वैयक्तिक स्वच्छता न करता,केस न विंचरलेले,कपड्यांना बटन न लावता,फाटके कपडे,अशा प्रकारे शाळेत येतात.म्हणून शाळेच्या नवनियुक्त शिक्षणसेविका सौ.सोनाली मोरे मॅडम यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागाव्यात त्यासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे मुख्याध्यापक श्री.मोरे सरांना सांगितले असता ती संकल्पना खूप छान वाटली व लगेच ही संकल्पना सर्व वर्गांसाठी लागू करूया असे मुख्याध्यापक श्री.मोरे सरांनी सांगितले.
नाविन्यपूर्ण उपक्रमानुसार दरदिवशी स्वच्छ व सुंदर येणाऱ्या मुलांचा फिरती ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून आजचा स्वच्छता पुरस्काराचा मानकरी या नावाने पुरस्कार देण्याचे ठरले. त्याप्रमाणे प्रत्येक वर्गातून स्वच्छ व सुंदर येणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर पुरस्कार देण्याचे ठरले.
आज उपक्रमाच्या पहिल्या दिवशीच उपक्रमाला चांगले यश आल्याचे दिसून आले. आज सर्व विद्यार्थी स्वच्छ व सुंदर कपडे घालून आले. उपक्रमात ठरल्याप्रमाणे आजचे स्वच्छता पुरस्काराचे मानकरी खालीलप्रमाणे निवडून त्यांना आजचा स्वच्छता पुरस्कार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
आजचे स्वच्छता पुरस्काराचे मानकरी.
पहिली
1) तनिष्का गजानन लेंडी
2) हंसिका दिगंबर वारगुडे
दुसरी
1) जागृती प्रमोद शिद
तिसरी
1) सोनाली यशवंत शिद
2) गीतांजली गजानन लेंडी
चौथी
1) आकृती दत्ता शिद
सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा