स्वच्छतेची प्रतिज्ञा
स्वच्छता ही सेवा
स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता
दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४
स्वच्छतेची प्रतिज्ञा
महात्मा गांधीनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र नव्हते, तर त्या सोबतच एक स्वच्छ व विकसित देशाची संकल्पना होती.
महात्मा गांधीजींनी गुलामीतून भारत मातेला मुक्त करुन स्वातंत्र्य मिळवून दिले.
आता भारत मातेला अस्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची सेवा करणे आपले आद्य कर्तव्य आहे. मी शपथ घेतो की, मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागृत राहील आणि त्यासाठी वेळ ही देईल.
दरवर्षी १०० तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातुन २ तास श्रमदान करून स्वच्छतेच्या संकल्पनेला पुर्ण करेल.
मी स्वतः घाण करणार नाही, आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. सर्व प्रथम मी स्वतः माझे कुटुंब, माझी गल्ली/वस्ती, माझे गाव तसेच माझ्या कार्यस्थळापासुन या कामास सुरूवात करेन. मला हे मान्य आहे, की जगामधील जे देश स्वच्छ आहे. त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरीक स्वतः घाण करीत नाही व घाण होऊ देत नाहीत.
या विचारांचा मी गावोगावी व गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन. मी आज जी शपथ घेत आहे, ती आणखी १०० लोकांनाही घ्यायला लावेल.
ते ही माझ्या सारखेच स्वच्छतेसाठी १०० तास देतील यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मला माहित आहे की, स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे एक पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल.
।। जय हिंद, जय स्वच्छता ।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा