बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

शिक्षक वाढदिवस दिनी शिक्षकी सेवेचा गौरव: प्रमोद मोरे सर यांचा पाठ NCERT PM evidya चॅनेलवर थेट प्रसारित

 शिक्षक वाढदिवस दिनी शिक्षकी सेवेचा गौरव: प्रमोद मोरे सर यांचा पाठ NCERT चॅनेलवर थेट प्रसारित



उसऱ ठाकूरवाडी, ता. रोहा, जि. रायगड | दि. 19 ऑगस्ट 2025*

                     रायगड जिल्हा परिषदेच्या उसर ठाकूरवाडी शाळेतील प्रगत शिक्षणासाठी सतत झटणारे शिक्षक *श्री. प्रमोद दिगंबर मोरे* सर यांचा एक अनोखा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर झळकला आहे. त्यांच्या इयत्ता सातवीसाठी तयार केलेल्या *"श्रावणमास"* या कवितेवर आधारित पाठाचे थेट प्रसारण आज *PM eVidya चॅनेल क्रमांक 114* व *NCERT YouTube Live* वर करण्यात आले.


हे पाठ तीन वेळा प्रसारित झाले:

- सकाळी 9:54 वाजता  

- दुपारी 3:41 वाजता  

- रात्री 9:29 वाजता  


                 हे थेट प्रक्षेपण श्री. मोरे सरांच्या वाढदिवसानिमित्त प्रसारित झाले. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांपर्यंत मराठी साहित्य व कविता प्रभावीपणे पोहोचवली आहे.

                   या उपक्रमामुळे रायगड जिल्ह्यातील शिक्षणाची गुणवत्ता अधोरेखित झाली असून, जिल्ह्यातील इतर शिक्षकही प्रेरणा घेतील, असा विश्वास शाळेच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग, पालकवर्ग आणि सहकारी शिक्षकांनी मोरे सरांचे अभिनंदन केले आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती सराव पेपर क्र.2 इंग्रजी व बुध्दीमत्ता

इयत्ता चौथी - इंग्रजी व बुद्धिमत्ता सराव चाचणी मोफत शिष्यवृत्ती टेस्ट सीरीज पेपर क्र. २...