“तळा तालुक्यात मंथन सामान्य ज्ञान परीक्षा २०२५” गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
दि. १९ जुलै २०२५ रोजी, रा.जि.प. शाळा तळा मराठी येथे दुपारी १:०० वाजता मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा जल्लोषात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष मा. गटशिक्षणाधिकारी श्रीम. सुरेखा मारूती तांबट मॅडम,प्रमुख पाहुणे श्री. मुबीन वासकर सर विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख, तळा, श्री. संतोष पटाईत सर केंद्रप्रमुख, पिटसईकोंड, श्री. रविंद्र फडके सर केंद्रप्रमुख, टोकार्डे, श्री. विवेकानंद पोटे सर केंद्रप्रमुख, तांबडी,श्रीम. सुप्रिया जामकर मॅडम मुख्याध्यापक, रा.जि.प. शाळा तळा मराठी,श्रीम. सरलादेवी पवार मॅडम उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद दिगंबर मोरे सरांनी केले.
तालुक्यातील खालील गुणवंत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.इयत्ता 1 ली, आयुष संतराम बोडखे, राज्य: 30 | जिल्हा: 25 | केंद्र: 1, इयत्ता 2 री यशवर्धन धनंजय पवार, राज्य: 16 | जिल्हा: 11 | केंद्र: 1, स्वरा शंकर वाघरे – राज्य: 19 | जिल्हा: 14 | केंद्र: 2, रूही रवी नाक्ते राज्य: 21 | जिल्हा: 16 | केंद्र: 3, इयत्ता 3 री कोमल तुषार वाडेकर राज्य: 33 | जिल्हा: 26 | केंद्र: 1, संस्कृत रविंद्र लोखंडे – राज्य: 50 | जिल्हा: 43 | केंद्र: 2, इयत्ता 4 थी, पार्थ प्रमोद मोरे राज्य: 31 | जिल्हा: 25 | केंद्र: 1, ज्ञानदा गहिनीनाथ उस्तुरे राज्य: 36 | जिल्हा: 30 | केंद्र: 2, मानवी लालसिंग पवार, राज्य: 38 | जिल्हा: 32 | केंद्र: 3, साईश रविंद्र लोखंडे राज्य: 41 | जिल्हा: 35 | केंद्र: 4, इयत्ता 5 वी, श्रावणी प्रल्हाद दळवी राज्य: 22 | जिल्हा: 14 | केंद्र: 1, इयत्ता 7 वी, प्रांजल विश्वास गपट राज्य: 59 | जिल्हा: 34 | केंद्र: 1
या सोहळ्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी वाढवणे आणि त्यांचा आत्मविश्वास बळकट करणे हाच होता. पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.



























कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा